ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

भोंदू खरात अटकेपूर्वी 3 सनदी अधिकाऱ्यांना भेटला:अटकेची चाहूल शिर्डीत भेटल्याचा दावा; योनी शुद्धीकरणाच्या नावाने लैंगिक शोषण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू अशोक खरातने आपल्या अटकेची चाहूल लागताच शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात 3 सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे हे अधिकारी कोण? व त्या बैठकीत काय चर्चा झाली? असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. दरम्यान, अशोक खरातने योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची बाबही आता समोर आली आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अशोक खरातने आपल्या अटकेपूर्वी 3 आयएएस अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक झाल्याचा दावा केला आहे. विनोद नामक व्यक्तीने आयोजित केली बैठक यासंबंधीच्या वृत्तानुसार, अशोक खरातला बुधवारी अटक झाली. तत्पूर्वी 3 दिवस अगोदर त्यांनी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. हा विनोद नामक व्यक्ती अशोक खरातचा शिर्डी परिसरातील पंटर असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बैटखीत नेमके काय झाले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? व त्या 3 अधिकाऱ्यांनी अशोक खरातला कोणते आश्वासन दिले? याचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण या बैठकीत अटक झाल्याच्या स्थितीत पुढे काय करायचे? या मुद्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. योनी शुद्धीकरणाच्या नावाने लैंगिक शोषण दुसरीकडे, भोंदू अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला येत असल्याचीही बाब समोर आली आहे. यासंबधी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले आहे की, अशोक खरातकडे येणाऱ्या महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी व राजकीय कुटुंबातील होत्या. तो या महिलांना म्हणायचा की मी देव आहे. तुझे आयुष्य चांगले करायचे असेल तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल. त्यासाठी तो त्या महिलेला स्वतःची लघवी प्यायला लावायचा. एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी अशोक खरातकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्ने देऊन फसवले. त्याला प्रथम साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. त्यानंतर दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्ने खोटी निघाली. हा व्यक्ती त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री – पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे सूत दुसऱ्या एका महिलेशी जुळवू दिले. त्यानंतर ही महिला गरोदर राहिल्याचे खोटे सांगून त्याने त्या उद्योजकाकडून तब्बल 20 कोटी उकळले, असे खेमनार यांनी सांगितले. कोण आहे भोंदू अशोक खरात? अशोक खरात हा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो आपण सेवानिवृत्त कॅप्टन असल्याचा दावा करतो. खरात अंकशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अशोक खरातने मर्चंट नेव्हीतील आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 154 देशांचे दौरे केले. त्यात त्याने या देशांमधील धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता व नैसर्गिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी व उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या संपर्कात होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर