ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महीम:चिंचोली शाळा विजयी, स्पर्धेत जिल्ह्यातील लहान व प्रत्येकी 11 संघातील 264 खेळाडू सहभागी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


या स्पर्धेत चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवल्याबद्दल विजयी शाळेचे अभिनंदन करतो, खेळामध्ये हार जीत महत्वाची नसून खिलाडू वृत्तीने आपले क्रीडा कौशल्य दाखवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, जिल्हा कबड्डी समन्वयक सुहास गुरव यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग, सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग, मंगळवेढा आयोजित प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय कबड्डी (मुली) स्पर्धेत पारितोषक वितरण प्रसंगी बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यास्मिन शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, पुरुषोत्तम राठोड, समन्वयक श्याम सरगर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील लहान गटातील ११ संघ व मोठ्या गटातील ११ संघ या पद्धतीने एकूण २६४ खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आर.एस वराडे, व्ही. पी. बिले, बी.टी बाबर, अमित जावळे, शिवकुमार स्वामी, पंडित पाटील, गुलाब मासाळ, समाधान बंडगर, शिवाजी बेलभंडारे यांनी उत्तमरीत्या पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच गुणलेखक व वेळाधिकारी हे काम काम सर्जेराव रुपनर, गंगाराम चव्हाण, सतीश रणदिवे, तानाजी सूर्यवंशी, सतीश लेंडवे यांनी गुणलेखक व वेळा अधिकाऱ्याचे काम यशस्वीरित्या बजावले. या सर्व खेळाडूंना अतिशय उत्तमरित्या भोजन व्यवस्था सागर कोळेकर यांनी केली होती. या स्पर्धा पार पाडण्यासाठी राजू रायबान,अमित भोरकडे ,रवींद्र लोकरे जवाहरलाल प्रशालेतील स्वयंसेवक व कर्मचारी खंडू कोकरे व सोमा माळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पारितोषिक विजेते दत्तात्रय येडवे गुरुजी यांनी केले, आभार एम.डी.काळुंगे यांनी मानले. मोठ्या गटाचा अंतिम निकाल जि.प.प्राथ.शाळा महिम (ता.सांगोला) – विजेता जि.प.प्राथ. शाळा पापरी (ता.मोहोळ) – उपविजेता जि.प. शाळा, मारोळी (ता. मंगळवेढा)- तृतीय Share with facebook

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर