ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे कोंडीनंतर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाला वेग:सध्याचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 94 किमी लांबीचा अन् सहापदरी सिमेंट काँक्रीटचा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या गॅस टँकरच्या अपघाताने प्रशासकीय यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. ३२ तास वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी महामार्गावर अडकले होते. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आता “मिसिंग लिंक” प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून आगामी १ मेपर्यंत हा मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ९४ किमी लांबीचा असून तो ६ पदरी सिमेंट काँक्रीटचा आहे. शीळफाटा ते देहू रोडदरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा १११ किमी लांबीचा असून तो ४-पदरी डांबरी रस्ता आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हे खंडाळा टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिटजवळ वेगळे होतात. सध्या खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यानचा १९ किमीचा घाट विभाग वाहतुकीसाठी मोठे अडथळे निर्माण करतो. याच ठिकाणी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे ६ पदरी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे ४ पदरी असा एकूण १० पदरी वाहनभार एका ६ पदरी रस्त्यावर येतो. दरडी कोसळणे, वेगातील तफावत आणि सततची वाहतूक कोंडीमुळे या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला बोगदा हा जगातील सर्वात रुंद (सुमारे २३ मीटर) बोगद्यांपैकी एक आहे. हा बोगदा ८ पदरी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो खोदण्यात आला आहे. बोगद्याचे खोदकाम आणि दोन्ही बाजूंचे व्हायाडक्ट जोडण्याचे काम वेगाने पूर्ण होत आले आहे. लोणावळ्याजवळ टायगर पॉइंटच्या खालून जाणारा हा मार्ग तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता. प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोणावळा आणि खंडाळा घाटातील धोकादायक वळणे आणि दरडी कोसळण्याची भीती कायमची दूर होईल. अभ्यास गट स्थापन गॅस टँकर गळतीमुळे झालेल्या घटनांमुळे भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. आपत्कालीन प्रसंगांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, त्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून, येत्या १ मेपर्यंत हा रस्ता कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. आबासाहेब नागरगोजे, सचिव बांधकाम काय आहेत फायदे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर