ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात:राज्यभरातून 2 लाख भाविक तर देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली. कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. देशभरातून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. आज यात्रेचा पहिला दिवस असून श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. सर्व चारचाकी व तसेच दुचाकी वाहनांना मंदिराकडे प्रवेश बंद करण्यात आला. त्या सर्व वाहनांची पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आली. आज बुधवारी यात्रेचा अखेरचा दिवस असून यादिवशी किचेचा पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर यात्रा समाप्त होत आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच हॉटेल आणि दुकानदारांनी आपले दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्याकडूनही यात्रेतील भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेच्या पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवण्याचा पारंपरिक उत्सव असतो. यामध्ये कासेगावचे मानकरी भाऊसाहेब देशमुख यांचा मानाचा नैवेद्य देवीला दाखवून आल्यानंतर मानाचा लिंब, गंध हा विधी सुरु करण्यात आला. लिंबगंध कासेगावचे मानकरी वसंतराव देशमुख यांचे सुपुत्र संग्रामसिंह देशमुख याचा असतो. श्री यल्लमा देवीचे यात्रेत मानाचा लिंबगंध आणि नैवेद्य का कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर