ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार होते, हे 2000% सत्य:जितेंद्र आव्हाड यांचा दावा; फडणवीस-मिटकरी यांच्यावर बोलण्यास नकार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते, हे 2000% सत्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे. अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विरणीकरणाची चर्चा सुरू होती, असा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज राजकारणावर बोलणे योग्य नाही. आम्ही अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. अशावेळी अपघात कसा झाला? काय झालं? याविषयी प्रश्न विचारणे किंवा बोलणे देखील योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार होते, हे 2000% खरे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता आजपर्यंत झालेला नाही. त्यांची निर्णय क्षमता आणि काम करण्याचा हातोटी, होती असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. कोणताही निर्णय घेण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्यात सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर काहीही बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांनी नकार दिला आहे. मात्र राष्ट्रवादीचे विलनीकरण होणार होते, दोन हजार टक्के सत्य असल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मात्र, आता या संदर्भातले निर्णय हे राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. नेमकं काय होणार? दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर