ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

जालना हादरले!:अनैतिक संबंधाच्या संशयातून राजमहल टॉकीज परिसरात तरुणाचा खून, 18 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


धारदार शस्त्राने वार करुन एका ‎‎तरुणाचा खून करण्यात आल्याची ‎‎घटना जालना शहरातील‎ राजमहल टॉकीज परिसरात 13 ‎जून रोजी घडली होती. या‎ घटनेच्या दिवशी सदर बाजार ‎‎पोलिसांनी एका संशयिताला ‎ताब्यात घेतले होते. त्याची ‎सखोल चौकशी केली असता‎ जुना वाद व अनैतिक संबंधाच्या ‎‎संशयातून हा खून केल्याची ‎कबूली आरोपीकडून मिळाली ‎‎असल्याची माहिती पोलिसांनी‎ दिली आहे.‎ पोलिसांनी खून करण्यासाठी ‎‎आरोपीने वापरलेले धारदार शस्त्र ‎‎जप्त केले आहे. रफीक कासीम ‎शेख (टटूपुरा,जालना) असे‎ मृताचे नाव आहे. तर काशाफ ‎खान फेरोज खान (18, नादी ‎‎कॉलनी, बावन एकर जालना)‎असे खून करणाऱ्या संशयित‎ आरोपीचे नाव आहे. मयत इसम‎रफीक कासीम शेख हा वाळूचा ‎व्यवसाय करीत होता. त्याची‎ हत्या झाल्यावर सदर बाजार‎ पोलिसांनी पथके करुन तपास‎ करुन आरोपी उघड केला.‎ हा गुन्हा वरिष्ठांच्या ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मार्गदर्शनाखाली सदर बाजारचे‎ पीआय संदीप भारती, उपनिरीक्षक‎ सचिन सानप, जगन्नाथ जाधव,‎ रामप्रसाद रंगे, धनंजय कावळे‎ आदींनी हा खुनाचा गुन्हा उघड‎केला आहे. दरम्यान, हत्यारे‎ कोठून आणले, अजून कुणी यात‎ आहे का, याचा तपास‎ पोलिसांकडून केल्या जात आहे.‎ सीसीटीव्हीने तपासाला ‎मिळाली खरी गती‎ हत्या करण्यासाठी आरोपी हा‎स्कुटीवरुन तोंडाला रुमाल बांधून‎ आला होता. तो येत असतांना ‎शहरतील सीसीटीव्हीत कैद झाला‎ होता. पोलिसांनी या सीसीटीव्ही‎आधारे पहिल्या दिवशी त्याला‎ ताब्यात घेतले होते. त्या आधारे ‎त्याच चौकशी केली. सुरुवातील ‎त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.‎ नंतर त्याने गुन्हा कबुल केला असून‎ आरोपीकडून स्कुटी, धारदार शस्त्र‎ असा मुद्देमाल जप्त केला आहे.‎ शहरातील जागोजागी असलेल्या‎ सिसीटीव्हींमुळे पोलिसांना‎ तपासाला चांगलीच मदत होऊ‎ लागली आहे.‎ नाशिकमध्ये 4 लग्न केलेल्या प्रियकरानेच केला लिव्ह इन पार्टनरचा खून दुसरीकडे नाशिकमध्ये कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. मृत महिलेचे नाव सुनीता विश्वकर्मा (30) असून तिच्या प्रियकरानेच तिचा नाक व तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. गोपी गोसावी असे या संशयिताचे नाव आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ निरीक्षक संजय पीसे यांनी याबाबत माहिती दिली. महिलेचे लग्न झालेले आहे. ती संशयित गोपी गोसावी याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याचे 4 लग्न झाले आहे. घटनेच्या दिवशी त्यांचे काही तरी कारणाने वाद झाले. सुनीताचे नाक-तोंड दाबून तिला जीवे ठार मारले. घरातील सुटकेसमध्ये तिचा मृतदेह कोंबून भरला. मित्राच्या दुचाकीवर सुटकेस ठेवून कन्नमवार पुलाच्या खाली सुटकेस फेकून दिली.
भावाने दारुच्या नशेत असेल असे समजून केले दुर्लक्ष खून केल्यानंतर गोपीने भावाला फोन करुन घडलेला प्रकार सांगीतला होता मात्र, भावाने दारुच्या नशेत बोलत असावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तीन दिवसांनतर प्रसारमाध्यम, वृत्तपत्रात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी बघताच भावाच्या पायाखालची वाळू सरकली आणि थेट पोलिसांत धाव घेतली. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर