ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

हिंगोलीत मतमोजणीसाठी तगडा बंदोबस्त:५७ अधिकारी, ४९० पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान तैनात केले जाणार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात मतमोजणी तसेच मतमोजणीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असून ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी ता. २१ होणार आहे. मतमोजणीच्या काळात तसेच मतमोजणी नंतर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दोन पोलिस उपाधीक्षक, ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचारी, ६०० गृहरक्षक दलाचे जवान, दोन दंगा काबू पथक, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे. या शिवाय जिल्हाभरात गस्तीसाठी ४४ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे स्वतंत्र पथक हिंगोली शहरात तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यातील तीनही पालिकांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच शहरातील संवेदनशील भागात पोलिसांंची गस्त राहणार आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या बाहेर हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने छायाचित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात मतमोजणी नंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्यांवर तसेच अनुचीत प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर