ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सुषमा अंधारेंच्या ड्रग्सच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा पलटवार:म्हणाले- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा जिल्ह्यात सावरी या गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ एका शेडमध्ये जवळपास 145 कोटींचे ड्रग्स आढळून आले. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यासह प्रकाश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली. तसेच यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर जे बेछूट आरोप केले आहेत, त्यावर मी कालच प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी त्याच आरोपांचे रीपीटेशन केले आहे. केवळ राज्यात निवडणुका सुरू आहेत म्हणून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न अंधारे करत आहेत. पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, मागे सुद्धा दोन वर्षांपूर्वी जेव्हा एकदा नाशिकमध्ये ड्रग्स प्रकरण घडले होते, तेव्हा उत्पादन शुल्क मंत्री मी होतो आणि माझा थेट संबंध आहे अशा पद्धतीचे बेछूट आरोप त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केला होता. ज्यावेळी मी या आरोपांच्या विरोधात जाहीरपणे सांगितले की तुमचे हे विधान 48 तासांत मागे घ्या, माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा आणि ही कायदेशीर कारवाई न्यायालयात सुरू असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. “हॉटेल तेजयश माझे नाही, मी ती जागा चालवायला दिली आहे,” असा दावा प्रकाश शिंदे यांनी केला होता. मात्र, आज भर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी गुगल मॅप आणि व्हॉट्सॲप लिंकचा ‘लाईव्ह डेमो’ दाखवत, “हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंचेच आहे आणि अजूनही तेच चालवत आहेत,” असा सणसणीत आरोप पुराव्यानिशी केला. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर