ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह उद्धव ठाकरेंना धक्का:अनेक माजी नगरसेवकांनी हाती घेतले कमळ, मुंबईत पार पडला पक्षप्रवेश सोहळा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय आखाड्यात मोठे भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड आज मुंबईत पार पडली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दुसरीकडे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून, अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेतली आणि विजय मिळवला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती, असे बोलले जाते. आता फडणवीसांच्याच सूचनेनुसार सुरेंद्र पठारे घरवापसी करत असल्याने पठारे कुटुंबाने एकाच वेळी दोन्ही प्रमुख पक्षांशी ‘नाळ’ जुळवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे. सुरेंद्र यांच्यासोबतच पुण्यातील माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.

पिंपरीत अजितदादांना धक्का पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. आजच्या प्रवेश सोहळ्यात अजित पवार गटाचे तब्बल 8 आणि इतर पक्षांचे 7 अशा 15 बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ आणि माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांचा समावेश आहे.

ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही भाजपची वाट धरल्याने महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे. पिंपरी भाजपमध्ये ‘निष्ठावंतांचा’ उद्रेक एकीकडे मुंबईत इनकमिंगचा सोहळा सुरू असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या निष्ठावंत इच्छुकांनी बंडाचा इशारा दिला आहे.

“आम्ही 820 जणांनी मुलाखती दिल्या, पक्षासाठी वर्षे खर्ची घातली, मग आता उपऱ्यांचे लाड कशासाठी?” असा सवाल निष्ठावंतांनी उपस्थित केला आहे. “बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही शांत बसणार नाही, थेट बंड करू,” असा इशारा स्थानिक इच्छुकांनी दिला आहे. त्यामुळे हे ‘मेगा इनकमिंग’ भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड मधून भाजप प्रवेश केलेल नेते

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर