ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक:तरुण किराणा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील मडेघाट फाटा येथील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मडेघाट फाटा येथे रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. दुकानासाठी माल घेऊन परतणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत चप्राड येथील मोहन जयप्रकाश शहारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर धडक देणारा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. ​मृतक मोहन शहारे यांचे चप्राड येथे किराणा दुकान आहे. आपल्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ते नेहमीप्रमाणे लाखांदूर येथील घाऊक बाजारात गेले होते. १५ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी माल खरेदी केला आणि गावातीलच एका १७ वर्षीय सहकाऱ्याला सोबत घेऊन ते घराकडे निघाले. ​रात्री ८:३० च्या सुमारास त्यांची दुचाकी मडेघाट फाटा जवळ आली असता, समोरून (चुकीच्या बाजूने) येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोहन यांचा जागीच प्राण गेला. ​अपघातानंतर मोहन सोबत असलेल्या १७ वर्षीय मुलाने धडक देणाऱ्या चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. विरुद्ध दिशेने येऊनही इंडिकेटर किंवा हॉर्न का दिला नाही, असा प्रश्न विचारला असता, संबंधित चालकाने तिथे न थांबता आपल्या दुचाकीसह पळ काढला. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तातडीने मोहन यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना ‘मृत’ घोषित केले. केवळ २५ वर्षांच्या कष्टाळू तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चप्राड गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर