ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भाजप उमेदवाराचा ठाकरेंच्या उमेदवारावर हल्ला:चाकू हल्ल्याचा प्रयत्न, जीवे मारण्याचीही धमकी; वाशिम येथील घटनेने राजकारण तापले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वाशिम येथील भाजपच्या एका उमेदवाराकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून, भाजप उमेदवाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील लाखाळा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार गुड्डू उर्फ प्रवीण डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार सतीश उर्फ गल्ला वानखेडे यांनी निवडणुकीच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रवीण डोळे हे आपल्या मित्रांसोबत चर्चा करत होते. त्यावेळी सतीश वानखेडे तिथे आले. यावेळी निवडणूक व मतदानाच्या मुद्यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर वानखडे यांनी डोळे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही दिली.

वानखेडे व त्यांच्या समर्थकांनी यावेळी डोळे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनाही मारहाण केली. या घटनेनंतर वाशिम शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, सतीश उर्फ गल्ला वानखेडे याच्याविरोधात मारहाण, धमकी व हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश वानखेडे सध्या फरार आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सतीश वानखेडे हा फरार झाला आहे. वाशिम पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, या घटनेुमळे वाशिम शहर व परिसरात वातावरण तापले असून, निवडणूक काळात घडलेल्या या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. पण ठाकरे गटाने मतदारांना कोणत्याही दबावाला व धमक्यांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवले दुसरीकडे, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे मतदारांना डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.

धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी मतदान सुरू आहे. शहरातील बन्नाळी भागातील एका मंगल कार्यालय येथे भाजप उमेदवार व कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला. यासाठी शंभर ते दीडशे मतदार मंगल कार्यालयात आणण्यात आले. पण यावेळी पैसे वाटताना गोंधळ झाल्याने मतदारांनी आम्हाला कोंडून ठेवल्याचा आरोप केला.

पोलिसांनी या मंगल कार्यालयात कोंडून ठेवलेल्या मतदारांना बाहेर काढले. धर्माबाद येथे अध्यक्ष पदासाठी 9 व 11 प्रभागातून 22 सदस्यांसाठी 125 उमेदवार मैदानात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर