ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा:चाकू दाखवत सव्वा कोटींचे दागिने लंपास, पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील ‘भुताचा माळ’ परिसरात आली असता, बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले. पाठलाग करून गाठले आणि लुटले बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो आणि प्लास्टिक पोत्यातील 26 किलो अशी एकूण 60 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. थांबलात तर मारून टाकू! लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बस चालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला. “या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू,” अशी धमकी देऊन ते पसार झाले. प्रचंड घाबरलेल्या बस चालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून ‘112’ क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांच्या वर्णनावरून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. निवडणुकीच्या जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीती पसरली असून, अशा प्रकारे महामार्गावर बस लुटली गेल्याने खासगी बस कंपन्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर