ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्रीला बेड्या:गुन्हे खटला मिटवण्यासाठी बिल्डरकडे मागितले 10 कोटी रुपये; कोर्टाकडून पोलिस कोठडीत वाढ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गोरेगाव येथील एका प्रतिष्ठित बिल्डरला 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून खंडणीविरोधी पथकाने अभिनेत्री हेमलता पाटकर उर्फ हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी (27 डिसेंबर) या दोन्ही आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अरविंद गोयल (वय 52 वर्षे) हे गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी असून ते पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या मुलावर आंबोली पोलिस ठाण्यात एक फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला मिटवण्यासाठी आणि मुलाला कायदेशीर त्रासातून वाचवण्यासाठी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांनी गोयल यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खंडणी स्वरूपात उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच अरविंद गोयल यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री हेमलता पाटकर (उर्फ हेमलता बाणे, 39 वर्षे) यांचा इतिहास वादग्रस्त आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी मेघवाडी पोलिस ठाण्यात मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आणि शिवीगाळ (कलम 452, 323, 504) यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तर दुसरी आरोपी अमरिना इक्बाल झवेरी (उर्फ एलिस, 33 वर्षे) हिचाही या खंडणीच्या कटात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून तपासात सहकार्य नाही दरम्यान, हेमलता पाटकर यांच्या हस्ताक्षराचे नमुने आणि अमरिना झवेरी यांच्या आवाजाचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत. बिल्डरने खंडणीच्या व्यवहाराबाबतचा सविस्तर लेखी पुरावा पोलिसांना सोपवला आहे, ज्याची पडताळणी होणे बाकी आहे. या टोळीने आणखी किती बिल्डर्स किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना अशा प्रकारे लुटले आहे, याचाही संशय पोलिसांना आहे. मात्र, दोन्ही आरोपी महिला तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. मुलावरील खटला मिटवण्याच्या नावाखाली 10 कोटींची खंडणी मागणाऱ्या या ‘हाय-प्रोफाईल’ आरोपींचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. सोमवारपर्यंतच्या वाढीव कोठडीत या प्रकरणातील इतर फरार आरोपींचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हे ही वाचा… मनपा निवडणुकीसाठी इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या:सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, सोलापुरातील धक्कादायक घटना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या राजकीय धामधुमीत शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाच, लष्कर परिसरात एका इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अयुब सय्यद असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव असून ते प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करत होते. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर