ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीला दुजोरा दिला. दिल्लीतील एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित करत भविष्यातही अशा भेटी सुरू राहतील, असे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे या भेटीमागील राजकीय अर्थाला आणखी वजन मिळाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र भाजपकडून सुरुवातीला फक्त 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर हा आकडा 6 पर्यंत वाढल्याची चर्चा होती. जळगाव, नाशिक आणि रायगड या महत्त्वाच्या जागांवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर अपेक्षित जागावाटप होत नसल्यानेच एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र वेळ न मिळाल्यामुळे ती भेट होऊ शकली नव्हती आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले होते. तरीदेखील त्यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाशी संपर्क कायम ठेवला होता. अखेर शनिवारी रात्री अमित शहा यांच्या कार्यालयाकडून भेटीसाठी निरोप आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही माहिती न देता खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्याची सर्वाधिक चर्चा यासाठी झाली की, एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत पूर्ण गुप्तता पाळली होती. त्यांच्या सोबत कोणताही सहाय्यक किंवा अधिकृत ताफा नव्हता. त्यामुळे या भेटीमागे नेमकी काय राजकीय रणनीती आहे, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीहून थेट बंगळुरुला रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ते ठाण्यात परतल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण दौऱ्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एनडीएच्या नेत्यांना भेटलो तर त्यात चुकीचे काय? मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. दिल्लीला जाऊन एनडीएच्या नेत्यांना भेटलो तर त्यात चुकीचे काय? असा थेट सवाल त्यांनी केला. भविष्यातही दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संवाद आणि भेटी सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिल्ली भेट ही केवळ औपचारिक नव्हती, तर महत्त्वाच्या राजकीय चर्चांसाठीच होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच आता दिल्लीपर्यंत दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसून पुढील काही दिवसांत आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेत जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच आता दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर महायुतीत काही मोठे बदल होणार का, तसेच विधान परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर