ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:विलास लाडच्या ऑडिओ क्लिपवरून विजय वडेट्टीवार आक्रमक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये त्याने नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या कथित क्लिपमध्ये कुंभमेळ्यासाठीची सुमारे 1021 प्रकारची कामे ‘मॅनेज’ करून ठराविक लोकांना दिली जाणार असून, त्यातून कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचे लाड बोलताना दिसत आहे. या दाव्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (दिव्य मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी करत नाही). यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला अक्षरशः भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा एक एक पराक्रम आता उघड होत आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यात तो अधिकारी कुंभमेळ्याचे अनेक टेंडर ‘मॅनेज’ झाल्याचा, कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचा दावा करत आहे. या प्रकरणाची, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण कोण मंत्री, अधिकारी सामील आहेत हे समोर आले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. विलास लाडकडून कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष दरम्यान, एसीबीच्या अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत असून, यात त्याने नाशिक कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रिया आणि त्यातून मिळणाऱ्या कमिशनबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या संभाषणात तो समोरच्या व्यक्तीला कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष दाखवताना आणि टेंडर ‘मॅनेज’ करण्याबाबत बोलताना ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील विलास लाडच्या विधानांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नसली, तरी या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 500 कोटींचा मोठा कोटा असल्याचा दावा राज्य आणि केंद्र सरकारकडून कुंभमेळ्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील 500 कोटींचा मोठा कोटा आपल्याकडे असल्याचा दावा विलास लाडने या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. यामध्ये त्याने स्वतः 700 तंबूंचे काम, ई-टॉयलेट आणि साफसफाईची टेंडर्स मिळवल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 18 कोटींचे नाश्ता आणि जेवणाचे कंत्राटही आपल्याकडेच असून, 40 दिवसांच्या या सोहळ्यात प्रत्यक्ष खर्च कमी आणि कमिशनचे प्रमाण मोठे असल्याचे प्रलोभन तो समोरच्या व्यक्तीला देताना दिसत आहे. अधिकाऱ्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत सर्वांची ‘टक्केवारी’ निश्चित या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाडने भ्रष्टाचाराच्या साखळीचा उल्लेख करत सर्वच टेंडर्स आधीच ‘मॅनेज’ झाल्याचे म्हटले आहे. कुंभमेळ्यातील कामांमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत सर्वांची ‘टक्केवारी’ निश्चित झाली असल्याचा दावाही त्याने केला आहे. ई-टॉयलेट आणि साफसफाईच्या हजारो कामांतून लाखो रुपये कमावण्याची संधी असल्याचे सांगत, त्याने समोरच्या व्यक्तीलाही आपल्या ओळखीच्या लोकांना ही टेंडर्स मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या दाव्यांमुळे आता कुंभमेळ्याच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विलास लाडला 8 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी राज्य शासनाच्या अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सत्र न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी त्याने ही लाचेची मागणी केली होती, ज्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. लाडच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 2 लाखांची अतिरिक्त रोकडही जप्त करण्यात आली असून, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर