ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय?:सुनील तटकरेंचा भरत गोगवलेंना टोला, महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अलिबाग, महाड आणि विशेषतः तटकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने शेकापने राष्ट्रवादीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. या निकालानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? असे म्हणत तटकरे यांनी गोगवले यांना टोला लगावला आहे. सर्वात मोठा उलटफेर श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला, जो मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातनाक यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा केला. दुसरीकडे, महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपला गड राखला असून, शिवसेनेच्या सुनील कविसकर यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश कळमकर यांचा पराभव केला आहे. श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मंत्री भरत गोगावले स्वतः पोहोचले होते. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पराभवानंतर गोगावलेंनी विरोधी गटाच्या उमेदवाराचे स्वागत केल्याने सुनील तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? – सुनील तटकरेंचा टोला भरत गोगावले यांच्या भूमिकेवर टीका करताना सुनील तटकरे यांनी ग्रामीण म्हणीचा आधार घेत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, गेल्या अडीच-तीन वर्षांपासून जे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते, तेच आज त्यांच्या विजयाचे स्वागत करायला उभे आहेत. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, ‘पाचवी कोणाकडे चालते आणि घुगऱ्या कोण करते’. ज्यांच्याकडे मयती आहे, तेच घुगऱ्या करत आहेत आणि ज्यांची पाचवी आहे त्यांचं वेगळंच काही सुरू आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, जे उमेदवार मशालीवर निवडून आले आहेत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी महाडवरून लोक श्रीवर्धनला जात आहेत, हे अनाकलनीय आहे. या विधानामुळे रायगडच्या राजकारणात महायुतीमधील विसंवाद आता उघड झाला असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर