ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

राज्यातील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिकची, तर अरुण एम. यांच्यावर गडचिरोलीची जबाबदारी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने आज तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्याची कन्या डॉ. कश्मीरा संखे यांच्यासह शैला ए. आणि अरुण एम. या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज जाहीर झालेल्या आदेशानुसार, वित्त मंत्रालयातील सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकारी शैला ए. यांची आता मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या ठाणे जिल्ह्याच्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक जिल्ह्यातील ‘आयटीडीपी’ प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नाशिकमधील आदिवासी विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. 2023 च्या बॅचचे अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागात प्रशासकीय घडी बसवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बदल्यांचे सत्र सुरूच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण असताना गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्रिगुण कुलकर्णी यांची ‘यशदा’ (पुणे) येथून 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर