ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नगरपालिका निवडणुकीत भाजपने मोडले 30 वर्षांचे रेकॉर्ड:48 टक्के नगरसेवक एकट्या पक्षाचे, विजयाचे खरे मानकरी कार्यकर्ते – मुख्यमंत्री फडणवीस

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आज नागपुरातील ‘रामगिरी’ बंगल्यावर पाहायला मिळाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकट्याने 200 पेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आणत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. “महाराष्ट्रात भाजपच नंबर एकचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, राज्यातील 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीच्या 50 च्या विरोधात आमचे 210 नगराध्यक्ष निवडून आले असून, आम्ही विरोधकांचे किल्ले उद्ध्वस्त केले आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

राज्यात झालेल्या नगरपरिषद आण नगरपंचायत निवडणुकींमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत भाजपचे सर्वाधित 207 नगराध्यक्ष निवडून आलेत. निवडणुकीतील विजयानंतर नागपूरमधील भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील रामगिरी बंगल्यावर या विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. नगरसेवकांच्या संख्येत ऐतिहासिक भर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 1500 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यावेळी हा आकडा दुपटीने वाढून ३ हजारांच्या पार गेला आहे.

राज्यातील एकूण नगरसेवकांच्या 48 टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत. गेल्या तीस वर्षांतील निवडणुकींचा विचार केल्यास, एवढ्या मोठ्या संख्येने एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून, एक रेकॉर्ड आहे. ही किमया केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास आणि विकासाचे जे राजकारण सुरू केले, त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाली आहे.

विरोधकांचे बालेकिल्ले केले उद्ध्वस्त नागपूर जिल्ह्यातील विजयावर भाष्य करताना फडणवीस यांनी ‘सावनेर’चा विशेष उल्लेख केला. “आम्ही सावनेर नगरपालिका पूर्णपणे काँग्रेसमुक्त केली आहे. जे नेते आपल्या बालेकिल्ल्यावर वर्षानुवर्षे अधिकार सांगत होते, त्यांचे किल्ले आमच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. काटोलचा अपवाद वगळता जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिकांमध्ये भाजपने निर्भेळ यश मिळवले आहे. हा विजय म्हणजे नागरिकांनी आमच्या सरकारवर आणि कामावर दाखवलेला विश्वास आहे,” असे फडणवीस म्हणाले. खरे मानकरी पक्षाचे कार्यकर्तेच विजयाचा जल्लोष साजरा होत असताना फडणवीस यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना दिले.

“कालपासून अनेक लोक माझे अभिनंदन करत आहेत, पण या विजयाचा खरा मानकरी मी नसून तुम्ही सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित प्रतिनिधी आहात. तुमच्या मेहनतीमुळेच भाजपला हा अभूतपूर्व जनादेश मिळाला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. विजयाने मातणार नाही, माजणार नाही आपण जिंकलेली सगळी शहरे आणि न जिंकलेल्या शहरांमध्ये आपण चांगले काम करु आणि परिवर्तन घडवून आणू.

जी चांगली सुरुवात झाली आहे त्याचे प्रतिबिंब महापालिका निवडणुकांच्या निकालांमध्येही दिसेल याबाबत मला खात्री आहे. विजयाने मातणार नाही, माजणार नाही हा आपला संकल्प असला पाहिजे. निवडणुकीतला विजय ही आपल्या कामांची पोचपावती असते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर