ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

तडीपार गुंड मयूर शिंदेचा ठाणे भाजपमध्ये प्रवेश:टीकेनंतर पहिला सोहळा झाला होता रद्द; रवींद्र चव्हाणांनी फिरवली होती पाठ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्यामुळे जेलची हवा खावून चर्चेत आलेला तडीपार गुंड मयूर शिंदे याला अखेर भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे समोर आले आहे. मयूर शिंदेचा यापूर्वीच भाजप प्रवेश होणार होता. मात्र, मकोका प्रकरणात आरोपी असलेल्या गुंडाला प्रवेश देत असल्यामुळे टीकेची झोड उठली. त्यामुळे हा प्रवेश थांबला होता. मात्र, आता ठाणे महापालिकेची निवडणूक जवळ येताच हा प्रवेश उरकल्याचे कळते. त्याचे फोटोही समोर आलेत. आता भाजपने मयूर शिंदे याच्या प्रवेशाचा फारसा गाजावाजा केला नाही. ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा झाला. एक मुहूर्त टळला मयूर शिंदेच्या भाजप प्रवेशाचा मोठा गाजवाजा झाला होता. बॅनर लागले होते. आर. जे. ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर त्याचा प्रवेश सोहळा होणार होता. मात्र, मकोकामध्ये आरोप असणाऱ्या एका गुंडाला भाजपने पायघड्या टाकल्याचे आरोप झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण याच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार होता. मात्र, या टीकेमुळे रवींद्र चव्हाण यांनी ऐनवेळी या पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा पक्षप्रवेश टळला होता. भाजपचे दरवाजे खुलेच मयूर शिंदेचा पक्षप्रवेश टळल्यानंतर भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षाच्या प्रवेशाची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यांनी एकप्रकारे मयूर शिंदेला भाजपचे दरवाजे खुले असल्याचेच संकेत दिले होते. मयूर शिंदेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणेही झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमुळे हा पक्षप्रवेश स्थगित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा पक्षप्रवेश होणार याची शक्यता होतीच. तडीपारीनंतर ठाण्यात मयूर शिंदेवर हत्या, खंडणीसारखे गु्न्हे दाखल आहेत. तो पूर्वी भांडूपमध्ये रहायचा. मात्र, पोलिसांनी तडीपार केले. त्यानंतर तो ठाण्यात आला. मयूर शिंदेने 2017 मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्याला संधी मिळाली नव्हती. त्याने 2023 मध्ये खासदार संजय राऊत यांना धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटकही झाली. तेव्हापासून तो चर्चेत आला. गेल्या काही दिवसांपासून तो सतत भाजपच्या व्यासपीठावर दिसत होता. तिकीट मिळणार का? मयूर शिंदे तडीपारीनंतर ठाण्यात आला. त्याने प्रभाग क्रमांक 14 मध्ये तयारी सुरू केली. सावकरकर नगर परिसरातून त्याला ठाण्याची महापालिका निवडणूक लढवायची आहे. आता त्याचे भाजपमधून तिकीट मिळवायचे प्रयत्न सुरू आहेत. एकदा प्रवेश सोहळा रद्द झाल्यानंतरही पुन्हा पायघड्या टाकल्यामुळे मयूर शिंदेला भाजपकडून तिकीट मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर