ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सातबहिणी डोंगरावर भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला:एकाच कुटुंबातील 4 जण जखमी; नवस फेडण्यासाठी आल्यानंतर घडली घटना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नवस फेडण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणींच्या डोंगावर घडली आहे. या घटनेत 4 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी या डोंगरावर आले होते. यासंबंधीच्या माहितीनुसार, चाचरकर कुटुंबातील काही सदस्य सातबहिणींच्या डोंगावर आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी आले होते. त्यांनी पूजा सुरू केली असताना अचानक मधमाश्यांचा थवा त्या ठिकाणी आला. त्यांनी चाचरकर कुटुंबीयांवर हल्ला केला. यामुळे पूजास्थळी एकच धावपळ उडाली. सर्वजण जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे पळत होते. मधमाश्यांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यानंतरही या घटनेत पुजारी विठ्ठल चाचरकर (55), नत्थू चाचरकर (62), कविता चाचरकर (52) व सायली चाचरकर (3) हे 4 जण जखमी झाले. पोलिस, वनाधिकाऱ्यांनी केली सुटका या घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार व वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य राबवून तत्काळ जखमींना सुरक्षितरित्या डोंगरावरून खाली आणले. त्यानंतर त्यांना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. वनविभागाने भाविकांना अशा डोंगराळ भागात पूजा करताना धूर किंवा मोठा आवाज न करण्याचे आवाहन केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सातबहिणी डोंगरावर मधमाश्यांची अनेक पोळी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा पूजेसाठी लावण्यात येणाऱ्या उदबत्तींच्या धुरामुळे या माश्या आक्रमक होतात. त्यामुळे भाविकांनी डोंगरावर जाताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. माता न तू वैरिणी दुसरीकडे, एका निर्दयी आईने आपल्या पोटच्या गोळ्याला रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील पेणकरवाडा येथील वर्तक गल्लीत घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मीरा रोड पूर्वीतील वर्तक गल्लीत एक 3-4 महिन्यांचे मृत अर्भक सापडल्याची माहिती समाजसेवक सोमनाथ पवार यांनी काशिमीरा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भक ताब्यात घेतले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या अपत्याचा जन्म लपवण्याच्या उद्देशाने मृत अर्भक उघड्यावर फेकून त्याची विल्हेवाट लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी काशिमीरा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश बुहऱ्हाडे करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर