ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

रामदास आठवलेंचा मुंबईत ‘राजकीय बॉम्ब’:महायुतीने डावलल्याने 39 उमेदवार रिंगणात उतरवले, भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’आठवले गटाने बंडाचे निशाण फडकवले आहे. “भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आमच्याशी विश्वासघात केला आहे,” असा घणाघाती आरोप करत रामदास आठवले यांनी मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. रिपाईने आज 39 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, मुंबईत दलित मतांच्या विभाजनामुळे भाजप-शिंदे सेनेची डोकेदुखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला ७ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर चर्चाही झाली होती. मात्र, भाजपने 137 आणि शिवसेनेने 90जागांची घोषणा केली, पण या यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही महायुतीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेत, आपल्या पक्षाच्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. का वाढणार महायुतीची डोकेदुखी? मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती. मात्र, आता रिपाईने 39 उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दलित मतांचे विभाजन अटळ आहे. मुंबईच्या निवडणुकीत जिथे 100-200 मतेही जय-पराजयाचे गणित बदलू शकतात, तिथे रिपाइंचा हा ‘स्वबळ’ पॅटर्न भाजप-सेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता मागे हटणार नाही – रामदास आठवले प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, “आम्ही शेवटपर्यंत संयम राखला. 7 जागांची आमची माफक मागणी होती, पण आम्हाला झुलवत ठेवण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच आम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि आमच्या हक्कासाठी 39 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”
रिपाइं आठवले गटाची मुंबईतील उमेदवारांची यादी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर