ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हर हर महादेव!:5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांसाठी 5 नवे नियम लागू

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. मंदिर परिसरामध्ये सुरू असलेली विविध विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, मंदिर परिसरात गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासनाने 5 नवीन नियम लागू केले आहेत. 1. ऑनलाईन बुकिंग सक्तीचे: आता भीमाशंकर मंदिरामध्ये थेट जाऊन दर्शन घेता येणार नाही. भाविकांना दर्शनासाठी सुरुवातीला भीमाशंकर मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन ऑनलाईन बुकिंग करावे लागेल. 2. दिवसाला केवळ 1000 भाविकांना संधी: गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने भाविकांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. त्यानुसार प्रतिदिन केवळ 1000 नोंदणीकृत भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 3. ओळखपत्र अनिवार्य: ज्या भाविकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांनी दर्शनासाठी येताना आपले वैध सरकारी ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) सोबत आणणे बंधनकारक आहे. डॉक्युमेंट्सशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. 4. दर्शनाची वेळ निश्चित: दिनांक 15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दररोज केवळ 4 तास म्हणजेच सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. 5. पारदर्शकता आणि यादी जाहीर
ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांची यादी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत पारदर्शकता राहील. प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
पाच महिन्यांनंतर मंदिर उघडल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, नवीन नियमावली पाहता भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य ओळखावे. दर्शन सुरळीत होण्यासाठी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मंदिराचा इतिहास

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर