ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाण पुलासाठी न्यायालयात याचिका:पुलाचे काम रखडल्याने परिसरातील रहिवाशांच्या वतीने ॲड. नरेंद्र बेलसरे यांनी जनहित याचिका केली दाखल‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


न्यू तापडिया नगरातील रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलासाठी आता परिसरातील नागरिकांनी न्यायालयीन लढ्याचा बिगुल वाजवला आहे. उड्डाणपुलाच्या प्रलंबित बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बेलसरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. रस्त्यावरील लढाई आता कोर्टातपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. न्यू तापडिया नगर गेट क्रमांक ३८ येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. एवढेच नव्हे तर या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सात वर्षापासून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली या भागात तीन चाकी व चार चाकी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, लहान मुलांना तसेच वैद्यकीय उपचार घेणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असून दर पंधरा मिनिटानंतर गेट बंद राहते. अनेक वेळा वाद होतात. उर्वरित पान ४ या भागातील नागरिकांना त्रास रेल्वे गेट परिसरातून दररोज हजारो नागरिक शहरात येतात आणि जातात. न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, दमानी हॉस्पिटल, बापू नगर, शंकर नगर, क्रांती चौक, खरप, घुसर आपोती खुर्द आपातापा म्हैसांग या भागातील हजारो नागरिकांना शासनाच्या या दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. हा उड्डाणपूल मुंबई- हावडा व अकोला- नांदेड या दोन रेल्वे लाइनवर असून उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूंनी काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. या जनहित याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महानगरपालिका आयुक्त अकोला आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे, असे अॅड. बेलसरे यांनी कळवले आहे. जनहित याचिकेमध्ये मांडले काही महत्त्वाचे मुद्दे न्यू तापडिया नगर भागात विकास कामांना खीळ. सतत गेट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला. वीज नसल्यामुळे गुंडा गर्दीचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची भीती बळावली. वाहनधारकांना पडतो दहा किलोमीटरचा फेरा. रस्ते वीज आणि पाणी ही समस्या कायम आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर