ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबईत रिपाइंला एकही जागा नाही:केंद्रीय मंत्री रामदास आठवले संतापले; भाजप – शिंदे गटावर विश्वासघाताचा आरोप अन् इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी भाजप व शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइं (आ.) एकही जागा सोडली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले चांगलेच संतापलेत. महायुतीने आमच्यासोबत विश्वासघात केला. आम्ही हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी त्यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. भाजप व शिंदे गटाचे सोमवारी जागावाटप निश्चित करण्यात आले. त्यानुसार, मुंबईत भाजप सर्वाधिक 137 व शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. या जागावाटपात रिपाइंने महायुतीकडे 16 जागांची मागणी केली होती. पण भाजप व शिंदे गटाने त्यांना योग्य तो मान राखण्याचा शब्द देत शेवटपर्यंत झुलवत ठरले. यावर रामदास आठवले यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रवीण दरेकरांनीही रामदास आठवलेंना मुंबईत रिपाइंला सन्मानकारक जागा सोडण्याचा शब्द दिला होता. पण आता शिवसेना – भाजपच्या प्रत्यक्ष जागावाटपात रिपाइंला एकही जागा सोडण्यात आली. यामुळे आठवले चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी आपला संताप एका पोस्टद्वारे व्यक्त केला. हा निव्वळ विश्वासघात – रामदास आठवले रामदास आठवले म्हणाले, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत. मात्र, आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून, आज दुपारी पक्षाचा अंतिम निर्णय आणि भूमिका अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संभाजीनगरात युतीचा पोपट मेला दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप – शिवसेनेची युती तुटली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही युती तुटल्याची घोषणा केली. संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. पण सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या. मी सातत्याने स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्या. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बैठक झाली. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते. त्यामुळे त्यावेळी युती झाली, अशाच संभ्रमात आम्ही होतो. मात्र प्रत्यक्ष जागा देण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्याच जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणारी नव्हती. त्यामुळे आम्ही आमच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिरसाट म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर