ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अंजली दमानियांना गुप्त माहिती पुरवणारे सरकारमध्येच:सरकारच्या निशाण्यावर ‘स्वकीय’च, गोपनीय माहिती फुटल्यावरून राऊतांचा थेट CM वर निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्या काही रॉच्या प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे कोणती यंत्रणा नाही. ही गुप्त माहिती त्यांना मिळाली ती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्याशिवाय मिळत नाही, त्यांचे आणि भाजपचे संबंध आहेच ते टाळूच शकत नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी एक निशाणा धरला आहे. संजय राऊत म्हणाले की, बाह्यशक्तीकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवर असतात. गोपनीय माहिती बाहेर येते म्हणजे सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत. प्रतापराव जाधव यांच्याकडे भोजनाचे आयोजन होत असते तिथे सर्वांचे जाणे येणं असते त्यामध्ये काही गैर नाही. दिल्लीमध्ये एकमेकांकडे जाणं येणे होत असते, त्यात काही वेगळे नाही. त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा काहीही संबंध नाही. त्यावेळी पिंपरीत काटेंना उमेदवारी दिली होती संजय राऊत म्हणाले की, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तिथे जी पोटनिवडणूक झाली तिथे अजित पवार यांच्या पक्षाने नाना काटे हा उमेदवार दिला होता. भाजपने सुद्धा अशा अनेक निवडणुका लढवल्या आहेत. भावना फक्त आम्हालाच असतात शिवसेनेला हे लक्षात घ्या. ही निवडणुक महायुती विरुद्ध मविआ अशी होणार आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली पण त्यांनी काँग्रेसची चर्चा केली का याबद्दल मला माहिती नाही. बारामतीमध्ये पवारांना इतर कोणत्या पक्षाची गरज पडत नाही. त्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांची उद्धव ठाकरे यांची काय चर्चा झाली यावर त्यांची भूमिका काय यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: पत्रकार परिषद घेत आपल्याशी संवाद साधतील. काँग्रेस बारामती निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, त्यासाठी त्यांनी उमेदवारीसाठी 4 ते 5 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितले आहे की अजित पवार माझे चांगले सहकारी होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच बारामती पोटनिवडणुकीवर बोलतील. काँग्रेस वेगळी भूमिका घेणार दिसते संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचा पक्ष मविआमध्ये नाही तर महायुतीमध्ये आहे. मविआतील काँग्रेस पक्ष वेगळी भूमिका घेणार असे दिसत आहे. त्यामध्ये मविआ म्हणून आम्ही लक्ष घालावे असे मला वाटत नाही. पोटनिवडणुकीचा जो विषय आहे तो तिन्ही पक्षांनी एकत्र येत चर्चा करायला हवी. भाजपसोबत असलेल्या पक्षाला मदत होऊ नये अशी काँग्रेसची भूमिका असू शकते, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर