ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पिंप्री येथे अपूर्ण रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल:खडीकरण करून रस्ता अर्धवट सोडल्याने अपघातांचे सत्र सुरूच ; तत्काळ दुरुस्तीची मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ मोठे दगड आणि खडी टाकून रस्ता कच्च्या अवस्थेत सोडून दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिंपरी बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सध्या सर्वत्र सैल आणि मोठे दगड पसरलेले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांची वाहने वारंवार घसरत असून, दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या धोकादायक रस्त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात सापडला आहे. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या खडतर रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून, त्यांचा शैक्षणिक प्रवास त्रासदायक ठरत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, जर येत्या काही दिवसांत हा रस्ता दुरुस्त केला नाही, तर पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल. पर्यायाने गावाची वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची आणि बिकट होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट आणि अत्यंत निष्काळजीपणे करून ठेवले असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत. पहिल्याच पावसात हा कच्चा रस्ता वाहून जाण्याचा व चिखल होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने तात्काळ लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर