ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राहुल नार्वेकरांची दादागिरी!:हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- अजूनही वेळ गेली नाही, अन्यथा कोणालाही सोडणार नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच बीएसपी नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात देखील वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी हरिभाऊ राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, राहुल नार्वेकर मला म्हणाले की माझे सगळे प्रिव्हीलेज मी काढून घेईन. मी म्हटले साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता. त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहित असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेताय मग? हे सगळे मी रेकॉर्ड केले आहे. मी त्यांना म्हटले की मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला आणि वाहिनीला उमेदवारी द्यायची आहे. यासाठी धमक्या देत आहेत. आमच्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, त्यांना बाहेर काढले. पुढे बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने हे सगळे केले आहे. तो कृष्णा जाधव, तो म्हणतो की टोकन आम्ही नाही दिले. मी म्हटले तुमचे लोक काऊंटरवर बसवले आहेत, तो म्हणतो ते आमचे लोक नाही. मग चोर आहेत का? कोण आहेत ती माणसं? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला. ..अन्यथा आम्ही कोणालाही सोडणार नाही या संदर्भातील सगळी माहिती आम्ही गागरानी साहेबांना सांगितली आहे. आम्ही 12 लोक आहोत, आताही वेळ गेली नाही. आमचे अर्ज घेण्यात यावे, अन्यथा आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिला आहे. हरिभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणावर तातडीने पावले उचलत पालिका आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे प्रकरण? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक, बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्ज प्रक्रियेदरम्यान राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. याच उपस्थितीवरून वादाला तोंड फुटले आहे. इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आरोप केला आहे की, नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, निवडणूक आयोगाचा अहवाल काय निष्कर्ष काढतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तक्रारींमध्ये तथ्य आढळले, तर निवडणूक प्रक्रियेतील गंभीर उल्लंघन म्हणून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोप निराधार ठरल्यास विरोधकांच्या राजकीय डावपेचांवरही प्रश्न उपस्थित होतील. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत हे प्रकरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत या वादावर निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर