ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

काही लोक माझा पाठलाग करतायत, मदत करा!:जाधवांना भेटून युट्यूबर वेदपाठकने मांडली आपबिती, प्रसादच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी- अविनाश जाधव

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता थेट मनसेच्या दरबारी पोहोचला आहे. या मुद्द्यावर समाजमाध्यमांवर आवाज उठवणारा युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने मनसेचे बडे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रसादने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला असून, काही अज्ञात व्यक्ती आपला सतत पाठलाग करत असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, वाढत्या धमक्यांमुळे घाबरलेल्या प्रसादने काल मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपबिती मांडली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी प्रसाद वेदपाठकच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याचा शब्द दिला आहे. आमची बांधिलकी थेट जनतेशी आहे. प्रसादने जो आवाज उठवला आहे, तो एका विशिष्ट चुकीच्या वृत्तीविरोधात आहे. योग्य आणि न्याय्य गोष्टीच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच उभी राहिली आहे आणि पुढेही राहणार. आम्ही मतांच्या राजकारणासाठी नाही, तर मराठी अस्मितेसाठी लढतो, अशा शब्दांत जाधव यांनी प्रसादला धीर दिला. सत्य बोलल्याची हीच किंमत मिळते! दरम्यान, हा वाद उकरून काढल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे प्रसादने सांगितले. काही जैन धर्मीय सोशल मीडियावर आक्रमक झाले असून त्याच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्या जात आहेत. तसेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘मास रिपोर्टींग’ करण्यात आल्यामुळे त्याचे अकाउंट सस्पेंड झाले आहे. अकाउंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत प्रसादने, जे योग्य आहे ते बोलल्यानंतर हेच फळ मिळते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली . काही लोक पाळत ठेवून असल्याने जीवाला धोका निर्माण झाल्याचे सांगत त्याने मदतीचे आवाहन केले आहे.

नेमके प्रकरण काय? घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन कुटुंबीयांनी इतर सदस्यांना न विचारता जैन साध्वींच्या चालण्यासाठी रस्त्यावर पांढरी पट्टी मारली होती. सोसायटीतील इतर सदस्यांनी याला तीव्र विरोध केला होता. प्रसाद वेदपाठकने या घटनेवर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर आवाज उठवला. हा वाद वाढल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यात उडी घेत आक्रमक पवित्रा घेतला. या पांढऱ्या पट्ट्या तात्काळ हटवण्यात याव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने त्यावर काळा रंग मारण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. अखेर वाढत्या विरोधामुळे या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून ती हटवण्यात आली असून, स्वतः प्रसादने याची माहिती दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर