ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मविआ संपली, उद्धव ठाकरे एकटेच:विधान परिषद हाच उद्धव ठाकरेंसमोरचा शेवटचा मार्ग? त्यासाठीही इतर पक्षांची गरज- संजय शिरसाट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेत जायचे असल्यास इतर पक्षांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना विधान परिषद निवडणुकीत साथ देतात का, हे पाहावे लागेल. त्या पाठिंब्याशिवाय त्यांचे आमदार होणे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी विधान परिषदेवर निवड होऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या समोर कोणतीही थेट निवडणूक उपलब्ध नाही. त्यामुळे सभागृहात जाण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग हाच एकमेव पर्याय उरतो, असे मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीबाबत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेसची शरद पवार गटासोबत जाण्याचीही इच्छा उरलेली नाही, तर उद्धव ठाकरे गटाला त्यांनी आधीच बाजूला केले आहे. आगामी काळात काँग्रेस स्वबळावरच राजकारण करेल, असेच चित्र दिसत आहे. मुंबईत संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवार दिला नाही उगाच मराठी माणूस म्हणून काही बोलू नये. मविआ आता राहिलेली नाही. शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. बारामतीमध्ये पोटनिवणुकीत बिनविरोध निवडणूक होईल असे वाटते.
निवडणूक आयोग दखल घेईल संजय शिरसाट म्हणाले की, सोलापूरमध्ये धाब्यावर EVM मशीन सापडल्या तो प्रकार नेमके काय आहे हा चौकशीचा भाग आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असेल नेमका हा प्रकार काय हे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर समजेल. सोशल मिडीयावर काहीही येते संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जे काही दावे, आरोप होत आहेत खरंतर याची चौकशी सुरू आहे. आपले मत पोलिसांकडे नोंदवले पाहिजे. अजित पवारांच्या जाण्याचे दु:ख कमी आसणि आरोपांच्या फैरी जास्त झाडल्या जात आहे. हे काही बरोबर नाही. सोशल मिडीयावर कधी काय येईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. यामुळे लोकं गोंधळात पडत आहेत, यावर बोलणं योग्य नाही. अजित पवारांवर आता बोलणं योग्य नाही. संघाचे आपले वेगळे धोरण संजय शिरसाट म्हणाले की, संघाचे आपले एक धोरण असते ते स्वत:चे निर्णय स्वत घेत असतात. त्यांच्या कार्यकारणीमध्ये कुणाला घ्यायचे काय करायचे हा त्यांचा मुद्दा आहे. संघाच्या कार्यकारणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो.ते स्वतंत्र निर्णय घेत असतात. संघाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने कुणाला मतदान करावे असे सांगितले जात नाही. ते कोणत्या एका पक्षाचा कार्यकर्ता नसतो. सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला आला तर काय बिघडले? त्यांची विचारधारा बदलली आहे का? त्यावर आक्षेप घेणं गैर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर