ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पडताळणीनंतरच शेतीसाठी मिळेल‎ डिझेल:वारंवार घेतल्यास कारवाई‎, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा‎उपलब्ध असतानाही काही भागात‎इंधनाची अनधिकृत खरेदी, साठेबाजी,‎गैरवापराच्या घटना वाढल्याचे‎निदर्शनास आल्याने शासनाने कठोर‎पावले उचलली आहेत. वारंवार बॅरल,‎पिंपामध्ये इंधन घेतल्यास कारवाई‎होणार आहे. शेतीसाठी प्रत्यक्ष‎गरजेनुसार, योग्य पडताळणीच्या‎अधीन राहूनच डिझेलचा पुरवठा‎होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व‎ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या‎परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासन, पुरवठा ‎‎विभाग, पोलिस यंत्रणांना विशेष‎तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश‎दिले आहेत.‎ इंधन दरवाढीचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय ‎‎बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील ‎‎चढ-उतार असल्याचे सांगितले जात‎आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू ‎‎होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर ७० डॉलर‎होते. ते आता वाढून १०० डॉलर प्रती‎बॅरलच्या पुढे गेले आहेत. क्रूडच्या किमती ‎‎वाढल्याने तेल कंपन्या दबावाखाली होत्या.‎त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाई‎करण्यासाठी इंधन दरवाढीचे पाऊल‎उचलले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.‎दरम्यान खरीप हंगाम तोंडावर असतानाच‎शेतकऱ्यांसमोर डिझेलचा प्रश्न निर्माण‎झाला आहे. शेतातील मशागत, नांगरणी,‎पेरणीपूर्व कामे, ट्रॅक्टर चालवण्यासाठी‎शेतकऱ्यांना डिझेलची गरज भासत आहे.‎आता नवीन आदेशानुसार कृषी‎कामासाठी डिझेल हे पडताळणीच्या‎अधीन राहून मिळणार आहे.‎ असामान्य विक्री दिसल्यास अचानक तपासणी करणार‎ शहरात २० तर ग्रामीण भागात १२५‎पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्यात सुमारे १००‎ते १२५ टँकर्स येतात. मात्र जिल्ह्यात‎काही दिवसांपूर्वी पेट्रोलची विक्री ४४‎टक्के तर डिझेलची विक्री १५४ टक्के‎जादा वाढली होती. त्यामुळे आता‎पेट्रोल पंपांच्या दैनंदिन विक्रीची‎माहिती तपासली जाणार आहे.‎एखाद्या पंपावरील विक्रीमध्ये‎अचानक, असामान्य वाढ दिसल्यास‎तातडीने तपासणीचे आदेश देण्यात‎आले आहेत. तसेच जिल्हा‎प्रशासनाला तेल कंपन्यांशी समन्वय‎ठेवून पुरवठा साखळीतील विसंगती‎शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या‎आहेत.‎ कंपनीकडून खरेदी करणे अपेक्षित‎ मोठ्या औद्योगिक किंवा व्यावसायिक‎ग्राहकांनी थेट तेल कंपन्यांकडून इंधन‎खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र‎किरकोळ पेट्रोल पंपावरून मोठ्या‎प्रमाणात इंधन खरेदी केल्यास‎(घाऊक व्यावसायिकांनी)‎संबंधितांवर कारवाई होणार आहे. वैध‎पावत्या, डिलिव्हरी चलन किंवा‎स्फोटक सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय‎इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर,‎बाउझर, वाहनांची तपासणी करून‎कारवाई करण्यात येणार आहे.‎ परिपत्रकानुसार‎ संबंधितांना सूचना ‎देण्यात आल्या‎ आहेत‎ पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य‎शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सूचनांचे परिपत्रक प्राप्त झाले आहे. हे‎परिपत्रक संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. पेट्रोलपंपावर बल्कमध्ये इंधन‎मिळणार नाही. परिपत्रक ०७ नुसार कार्यवाही होईल.‎ – रवींद्र ऐन्नावार, जिल्हा पुरवठा अधिकारी.‎ कोणत्या अनियमिततेवर‎होणार कारवाई?‎ पेट्रोल किंवा डिझेलचा कृत्रिम तुटवडा‎निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात‎साठा करून काळ्या बाजारात विक्री‎करणाऱ्यांवर अत्यावश्यक वस्तू‎अधिनियमासह संबंधित कायद्यांनुसार‎कारवाई केली जाणार आहे. किरकोळ‎ग्राहक, अर्थात वाहनधारकांसाठी‎उपलब्ध असलेले इंधन इतर‎व्यावसायिक किंवा औद्योगिक‎वापरासाठी वळवल्यास संबंधितांवर‎जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील‎कलमानुसार कारवाई होणार आहे.‎ किरकोळ विक्री केंद्रांमधून टँकर, बाउझर‎किंवा मोठ्या कंटेनरमध्ये अनधिकृतपणे‎इंधन भरण्याच्या घटनांवर विशेष लक्ष‎ठेवून तपासणी केली जाणार आहे.‎वारंवार बॅरल, पिंप किंवा इतर कंटेनरमध्ये‎इंधन भरणाऱ्या संशयित वाहनांची‎चौकशी करून आवश्यक ती कारवाई‎करण्यात येणार आहे. सुरक्षा नियमांचे‎उल्लंघन करून इंधनाची वाहतूक,‎हाताळणी किंवा मंजूर क्षमतेपेक्षा अधिक‎साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार‎आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर