ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सुप्रिया सुळे म्हणाल्या उद्धवस्त झालो:युगेंद्र पवारांना अश्रू अनावर; अजितदादांच्या निधनाने सैरावैरा कार्यकर्त्यांची बारामतीकडे धाव!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पवार कुटुंब, बारामतीकर आणि संबंध राज्यवर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच युगेंद्र पवारांना अश्रू अनावर झाले. तर सुप्रिया सुळे यांनी उद्धवस्त झाल्याची प्रतिक्रिया दिली. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतलीय. अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजताच बारामतीतल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. अजितदादांना दाखल असलेल्या रुग्णालयाकडे कार्यकर्ते आणि शहरवासीयांनी धाव घेतली. पोलिस अधीक्षक म्हणाले… पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी विमान अपघाताची माहिती दिली. ते म्हणाले की, अपघातामध्ये विमानाचे प्रचंड नुकसान झालेय. घटनास्थळावरून तीन मृतदेह सापडलेत. त्यांचीही अवस्था अत्यंत गंभीरय. ओळख पटणेही मुश्कील झाले आहे. आम्ही तांत्रिक तपासणी आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया वेगाने करत आहोत.’ अजितदादादा दाखल असलेल्या रुग्णालयाबाहेर कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी प्रचंड गर्दी केली होती. ते प्रचंड भावुक झाले होते. त्यांचे हे अजितदादांवरले प्रेम पाहता, त्यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मात्र, काही वेळेतच अजितदादांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. सुप्रिया सुळे म्हणाल्या… अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्याचे समजताच त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीहून तात्काळ बारामतीकडे रवाना झाल्याचे समजते. सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून एकाच शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी devasted असे व्हॉटसअप स्टेटस ठेवून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. युगेंद्र पवारांना अश्रू… अजितदादांच्या निधनाची वार्ता समजताच श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे पणतू युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा फोनवर बोलतानाच बांध फुटला. यापू्र्वी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर पवार कुटुंबाने आम्ही सारे एकच आहोत, हा संदेश नेहमीच महाराष्ट्राला दिला होता. मुंडे, चिखलीकर, देशमुख झाले भावुक अजित पवारांच्या निधनाबद्दल धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला. वडिल गेले. त्याचे दुःख माझ्यावर कोसळले. मात्र, त्यानंतर अजितदादांनी वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांच्या निधनाची वार्ता ऐकून राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अनावर झाले. ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अजितदादांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. त्यांनी दादांसोबत काम केलेल्या अनेक आठवणी माध्यमांशी बोलताना शेअर केल्या. दादांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले असून, ते भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कल्पेनेच्या पलीकडे घडले विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार. जे होणार ते काम करणार असे स्पष्टवक्ता नेता होते. मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी मला विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. २५ वर्ष त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे. कल्पनेच्या पलीकडचे हे घडले आहे. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे.’ कसे कोसळले विमान? अजित पवार सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीला निघाले होते. हे विमान बारामती विमानतळावर सकाळी ९ ते ९:१५ च्या दरम्यान आले. ते उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवर उतरण्याऐवजी जवळच्या शेतात कोसळले. विमानला आग लागली. काही वेळातच ते जळून खाक झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. लोकांनीही ती मृतदेह पडल्याचे पाहिले. यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. प्रशासन, आपत्कालीन सेवांनी तात्काळ धाव घेतली. हा विमान अपघात म्हणजे पायलटची चूक होती का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. अजित पवारांची शेवटची पोस्ट… अजित पवार यांचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. अनेकदा सकाळी सहालाच ते मतदार संघाचा दौरा करायचे. ते कामात नेहमी व्यस्त असत. विशेष म्हणजे वेळ पाळण्यात ते पक्के होते. त्यांच्या कामाचा उरकही प्रचंड होता. कार्यकर्त्याचे एखादे काम होणार असेल वा नसेल, ते त्याला स्पष्टपणे सांगायचे. त्यांनी ‘एक्स’वर केलेली शेवटची पोस्टही मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची होती. ती अशी…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर