ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. काही महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. मात्र दीड महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून आता मुंढे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. राज्यातील या विभागावर मागील काही काळात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गैरव्यवहारांचे आरोप झाले होते. अन्न आणि औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने या खात्यात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. अनेकांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या या मोहिमेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन उभं करण्याचं आव्हान दरम्यान, दिव्यांग विभागातील कारवाई जोरात सुरू असतानाच 31 मार्च रोजी त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्या कारवाईची गती मंदावल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा नव्या विभागात रुजू होताना तुकाराम मुंढे यांच्यासमोर भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन उभं करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागात पुढील काळात कोणते धडाकेबाज निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर