ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कानडा येथे संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कानडा पार्डीच्या वतीने थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची ६९ वी पुण्यतिथी आज (दि. २० डिसेंबर) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच सौ. सुषमा रुपेश ढोके यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या स्वच्छता व समाजसेवेच्या विचारांना अनुसरून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भजनाच्या निनादात गावातून स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

या उपक्रमात गावातील महिला व पुरुष नागरिक, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस, महिला भजन मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, ग्रामपंचायत उपसरपंच तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रभाकर फुलभोगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते सूरज येवले यांनी मानले.संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, साधेपणा व समाजसेवेच्या विचारांना उजाळा देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वी ठरला.


ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर