ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी:प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता असताना काय केले? महायुतीच्या वचननाम्यावर कॉंग्रेसचा हल्लाबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला. यावर आता कॉंग्रेसने टीका केली आहे. त्यांनी 2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. 4 वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले, गेले दोन महिने हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम केल्यानंतर प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला जुमलानामा जाहिर केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी 2017 चा भाजपचा जाहिरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न आहे. यातील काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत. 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले? अजून काही भाजपच्या हायलाइट्स आम्ही लवकरच जाहिर करु, असे सावंत यांनी म्हटले आहे. पुढे सचिन सावंत म्हणाले, मुख्यमंत्री हे “सपनों के सौदागर” म्हणजे स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे सोनेरी भविष्याचे रंग दाखवताना वर्तमान किती काळा आहे हे सांगत नाहीत. त्यांच्या सर्व मुलाखतीतून भविष्यातील संकल्पना सांगतात पण आतापर्यंतची आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाहीत. ईस्टर्न फ्री वे 2017 साली ठाण्याला जोडण्यात येणार होते. पूरमुक्त मुंबई 2017 साली आश्वासन होते ते आश्वासन आजही आहे. मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही. तारीख पर तारीख हा डायलॉग मुख्यमंत्र्यांकडून घेतला असावा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर होणार यासाठी 2019 पासून वेगवेगळ्या तारखा देत आले. अद्याप जवळपासही पोहोचलो नाही. एलेव्हेटेड रोडचे काय झाले? बांगलादेशी-रोहिंग्या सर्वात जास्त शोधून काढले असे मुख्यमंत्री म्हणतात मग आकडेवारी जाहीर करा, असे आव्हान सावंत यांनी केले आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट; महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहीर मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर