ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नियतीचा क्रूर खेळ!:पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू; नवजात चिमुकलीने घेतले वडिलांचे अंत्यदर्शन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद-श्रीनगर येथे कर्तव्य बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आले असताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या स्वागतासाठी आणि आनंदाच्या क्षणी सहभागी होण्यासाठी घरी परतलेल्या या वीर जवानाचा अशा प्रकारे अपघाती अंत झाल्याने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. काळाचा अत्यंत क्रूर खेळ या घटनेतून समोर आला असून, आईच्या पश्चात पत्नीच्या बाळंतपणासाठी आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेल्या जवान प्रमोद जाधव यांचा वाढे फाट्याजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. एकीकडे आज सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी दरे येथे आणले जात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. घरात नव्या जीवाच्या आगमनाचा आनंद साजरा होण्याऐवजी कुटुंबाचा आधारवड गेल्याने, पित्याचा मृत्यू आणि मुलीचा जन्म अशा हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. वीर जवान प्रमोद जाधव यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला. अवघ्या काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जेव्हा आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसमुदायाचे डोळे पाणावले. शासकीय इतमामात आणि ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांमध्ये या देशपुत्राला साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा पाहण्यापूर्वीच काळाने हिरावून नेलेल्या या पित्याच्या अकाली निधनामुळे आणि नियतीच्या या क्रूर खेळामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर