ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

१४ जानेवारीपासून विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’:रजोनिवृत्ती काळातील महिलांची दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभागात तपासणी अन् मार्गदर्शन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील महिलांच्या रजोनिवृत्ती काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळेवर व शास्त्रीय उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी ता. १४ या क्लिनीकची सुरुवात होणार असून यापुढे दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या मासीक पाळीच्या समस्यांमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन होणार आहे. महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे शारिरातील उष्णता वाढ, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, वजन वाढणे, हृदयविकाराचा धोका अशा विविध समस्या आढळून येत आहेत. मात्र महिलांकडून या समस्यांकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांना पुढील काळात गंभीर समस्यांना सामोरो जावे लागले. या काळात महिलांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व औषधोपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने महिलांसाठी स्वतंत्र ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्य्च्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात दर बुधवारी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु केला जाणार असून बुधवारपासून ता. १४ या क्लिनीकला सुरवात केली जाणार आहे. या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार उपचार, समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशन, कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी संदर्भातील उपचार आणि आवश्यक तपासण्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. दर बुधवारी होणाऱ्या या विशेष बाह्यरुग्ण तपासणीचा महिलांनी घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांबाबत संकोच न ठेवता पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मेनोपॉज क्लिनिक’मुळे महिलांचे दीर्घकालीन आरोग्य सुदृढ राहण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर