ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कळंब येथे खोदकामात पुरातन शिवपिंड व नंदी सापडले; नागरिकांची गर्दी

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खोदकाम थांबले, श्रद्धा जागी; कळंबात शिवपिंड–नंदीचा शोध

तालुका प्रतिनिधी कळंब :- रितेश क्षिरसागर

कळंब शहरातील शिरभाते ले-आऊट येथील नगर पंचायतच्या ओपन स्पेसमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पुरातन काळातील शिवपिंड, नंदी व शिवलिंग आढळून आल्याने बुधवारी (दि. १५) परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

नगर पंचायतच्या वतीने समाज भवनाच्या बांधकामासाठी पाण्याच्या टाकीजवळ सकाळी सुमारे ११ वाजता खोदकाम सुरू असताना मजुरांना जमिनीत दगडी संरचना आढळून आली. पुढील खोदकामात नंदी, शिवपिंड व शिवलिंग स्पष्टपणे दिसून येताच काम तात्काळ थांबवण्यात आले.

सापडलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर अथवा धार्मिक स्थळ अस्तित्वात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धार्मिक श्रद्धा तसेच ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांकडून पुरातत्त्व विभाग व इतिहासतज्ज्ञांनी तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

घटनेची माहिती नगर पंचायत व स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून, पुढील कोणतेही खोदकाम थांबवून कायद्यानुसार पुरातत्त्व विभागाला कळवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भारतीय पुरातत्त्व कायद्याच्या चौकटीत या स्थळाचे संरक्षण व संवर्धन करण्यात यावे, अशीही भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अधिकृत पाहणी व निर्णयाची प्रतीक्षा असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर