ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जागृती आणि शिक्षा:19 गावे नशामुक्त; आता ‘माजी मद्यपी’ इतर 20 गावांना नशामुक्त करतायेत! दारू पिणाऱ्यास 5 हजार रुपये दंड

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील ‘तळीरामांची गावे’ म्हणून कुख्यात १९ गावे नशामुक्त झाली आहेत. विशेष बाब म्हणजे या गावांमधील घोषित मद्यपी आता आसपासच्या इतर २० गावांना नशामुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. यासाठी त्यांनी रीतसर पथक तयार केले असून ते या गावांमध्ये जनजागृती अभियान चालवत आहेत. ते संवाद साधतात. ‘दारू शरीरासाठी घातक आहे आणि ती कुटुंबाचा नाश करते. त्यामुळे आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका.’ स्थानिक लोक सांगतात की, या १९ गावांतील लोकांना नातेवाईक लग्नसमारंभातसुद्धा बोलावत नसत. गावातील आदिवासी पंचायत, समाजसेवक, ग्रामस्थ, पोलिसांनी गावांत बैठका घेतल्या. समजावण्याचा प्रयत्न केला. एकमत नव्हते, तरीही प्रयत्न सुरूच राहिले. सुमारे ७ वर्षांपूर्वी पंचायतीने दारू पिणाऱ्यावर आणि ज्याच्या घरी दारू पिली गेली, अशा दोघांवरही ५,००० रुपयांचा दंड ठोठावला. अखेर ७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या जगजागृतीला यश आले. ही गावे नशामुक्त झाली आहेत. बदल : लग्नकार्यांची आमंत्रणे मिळू लागली व्यसन सुटल्यामुळे पैशांची बचत झाली. यामुळे कुटुंबाचा जीवनस्तर उंचावला. त्यांना समाजात सन्मान मिळला. नातेवाइकांनी बहिष्कार टाकला होता, आता ते त्यांना आपल्या घरच्या कार्यक्रमांसाठी आमंत्रणे पाठवत आहेत. शिक्षण… निरक्षर मुलांचे शहरांमध्ये शिक्षण पूर्वी पुरुष आपली कमाई दारूमध्ये उडवायचे. घर महिला चालवत होत्या. आता ते आपल्या मुलांना शहरात शिक्षणासाठी पाठवत आहेत. पक्की घरे बांधली गेली.दारू विकणारे, पिणारे हात किराणा दुकान चालवतात. दूध विकतात. अमरावतीमधील ही १९ नशामुक्त गावे बासपाणी, मांडवा, कोठा, शिरपूर, आकी, घुटी, मांडू, मोगर्दा, तलई, रानामलुर, घोटा, चित्री, बोरी, कारा, बोथरा, जामपाणी, कुसुमकोट (खुर्द), दिया आणि बोड. महिलांच्या हातात पैसा उरला, कर्जातून मिळाली मुक्ती दारूबंदीनंतर पुरुष आता घरखर्च आणि बाजारासाठी महिलांना पैसे देतात. पूर्वी महिलांना मुलांचे पोट भरण्यासाठी वणवण फिरावे लागायचे आणि उधार घेऊन घर चालवावे लागायचे. त्यामुळे त्या कर्जात बुडाल्या होत्या. परंतु आता घरांमध्ये धान्य, भाजीपाला आणि किराणा सामान वेळेवर येत आहे. -दीपक गायन, सामाजिक कार्यकर्ता, मेळघाट येथे यशस्वी झालो, आता इतर गावांना नशामुक्त करणार मेळघाटमधील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना दारूच्या व्यसनात बुडलेले पाहून उद्ध्वस्त संसार बघवले जात नव्हते. म्हणूनच ग्रामस्थांच्या मदतीने दारूबंदी केली. अजून २० गावांना नशामुक्त करू . -प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार, मेळघाट

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर