ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

जय पवार यांची उद्याची पत्रकार परिषद लांबणीवर:अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अजित पवार कुटुंबातील सदस्य प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. अजितदादांचे सुपुत्र जय पवार उद्या (9 तारीख) पत्रकार परिषद घेणार होते. पण त्यांची उद्याची पत्रकार परिषद काही कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता ते प्रत्यक्ष माध्यमांसमोर येत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. जय पवार यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला होता. या अपघाताचे ‘निर्विवाद सत्य’ बाहेर आलेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. DGCA ला उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ‘ग्राउंड’ करण्याची आणि रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणी केली होती. ही ‘एका मुलाची आर्त हाक’ असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अहवाल हाती आल्यावर बोलणं योग्य दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. अनेक एजन्सीमार्फत चौकशी सुरू आहे. सध्या जो अहवाल समोर आला आहे, तो केवळ ‘प्राथमिक’ आहे, तो पूर्ण नाही. सर्व अहवाल हाती आल्यानंतरच यावर सविस्तर बोलणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी संयमी पण महत्त्वाची भूमिका मांडली आहे. रोहित पवारांकडून नेत्यांच्या भेटी यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी सातत्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पुरावे मांडण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला शरद पवारांनी हा केवळ अपघात असल्याचे म्हटले होते, मात्र रोहित पवारांच्या दाव्यांनुसार, शरद पवारांचे विधान हे केवळ त्यावेळची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी होते. रोहित पवारांनी राज्यातील मविआतील नेत्यांसह राज ठाकरेंची भेट या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. तर गेली 2 दिवस ते दिल्लीत असून दिल्लीतील विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेट अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा करत त्यांनी हा मुद्दा संसदेत मांडावे अशी विनंती करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर