ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सदा सरवणकरांच्या मुलाचा पराभव:ठाकरेंच्या शिलेदाराने केला हिशेब चुकता; मुंबईत अनेक दिग्गज नेत्यांच्या नातलगांना पराभवाचा धक्का

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिकेतील प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अतितटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाने त्यांच्या मुलाचा पराभव केला आहे. यामुळे सदा सरवणकर यांना दुहेरी झटका सहन करावा लागला आहे. दादर – प्रभादेवीतील वॉर्ड 194 मध्ये ठाकरे व शिंदे गटात अत्यंत हायव्होल्टेज लढत होती. शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिंदे गट व ठाकरे गटातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे आपले गुरू माजी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला. ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे सरवणकरांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. महापालिका निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे यांनी युती केली होती. या दोघांच्या युतीत हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला सुटला होता. निशिकांत शिंदेंनी दिली समाधान सरवणकरांना मात प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 वर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. पण हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. याठिकाणी शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत शिंदे अशी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा 592 मतांनी पराभव केला. सरवणकर व महेश सावंत यांच्यात राजकीय हाडवैर उल्लेखनीय बाब म्हणजे प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सदा सरवणकर व महेश सावंत यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. 2017 मध्ये महेश सावंत यांना डावलून सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यानंतर सावंत यांनी बंडखोरी केली. मात्र, त्यांना अवघ्या 252 मतांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना फुटल्यानंतर सदा सरवणकर हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर प्रभादेवीत दोन्ही गटात राडा झाला. एका प्रसंगात सरवणकर यांनी पिस्तुलीतून गोळी झाडल्याचाही आरोप झाला. मुंबईत दिग्गजांच्या नातलगांना पराभवाचा धक्का दुसरीकडे, मुंबईत अनेक दिग्गजांच्या नातलगांना पराभवाचा धक्का बसला आहे. गँगस्टर अरुण गवळींची मुलगी गीता गवळी या प्रभाग क्रमांक 212 मधून मैदानात उतरल्या होत्या. त्यांचा पराभव झाला आहे. तर रवींद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांनाही पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेने प्रभाग क्रमांक 73 मध्ये दीप्ती वायकर पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. प्रभाग क्रमांक 184 मध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना पराभूत व्हावे लागले. काँग्रेसच्या आशा काळे यांनी त्यांचा पराभव केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे. ते कुर्ल्याच्या प्रभाग क्रमांक 165 मधून मैदानात होते. महापालिका निवडणुकीत चर्चेत असलेल्या काही उमेदवारांचाही या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यात ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, हेमांगी वरळीकर, तर भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आणि असलम शेख यांच्या भगिनीने विजय मिळवला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर