ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भाजप नेते प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंच्या भेटीआधी धमकीचा फोन:हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यांनी 30 मेपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना उपोषण न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना थेट अंतरवलीत येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं. प्रसाद लाड यांनीही ही विनंती स्वीकारत आज भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना धक्कादायक प्रकार घडला. लाड यांच्या पीएला आधी धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच दोन जणांनी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी संशयितांना अडवत चौकशी केली असता ते निवेदन देण्यासाठी आल्याचं सांगत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आणखी एक संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाबाबत स्वतः प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण फरार आहे. हे लोक हॉटेलच्या परिसरात आले होते. पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी निवेदन द्यायला आल्याचं सांगितलं. मात्र त्यांची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर पोलिसांनी हॉटेल परिसरात सुरक्षा वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर