ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

IT इंजिनिअरची दरीत उडी घेत आत्महत्या:पत्नी अन् मित्रांना ईमेल, मेसेज करून संपवले जीवन; लोणावळा लायन्स पॉईंट येथील घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील एका अभियंत्याने पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून 250 फूट खोल दरीत उडी घेऊन स्वतःची जीवनायात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यातील आयटी क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विरेंद्र सिन्हा (32) असे मृत आयटी इंजिनिअरचे नाव आहे. ते पुण्याील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका कंपनीत कार्यरत होते. त्यांनी लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथील एका खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यांची कार गुरूवारी सकाळी लायन्स पॉईंट येथे संशयास्पद स्थिती पार्क केल्याचे आढळली. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या मित्रांना व पत्नीला ईमेल व फोन मेसेजद्वारे आपण टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे कळवले होते. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना ही बाब कळवली. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम राबवली असता त्यांचा मृतदेह खोल दरीत आढळला. विरेंद्र सिन्हा यांनी ज्या ठिकाणी आपली कार उभी केली होती. त्याच्याच समोरील दरीत सुमारे 200 ते 250 फूट खोल अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. स्थानिक बचाव पथक शिवदुर्गच्या सदस्यांच्या मदतीने गुरूवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
12 तारखेला होता पत्नीचा वाढदिवस विरेंद्र सिन्हा यांच्या पत्नीचा 12 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यावरून पती-पत्नीत गत काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादानंतर विरेंद्र यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन नंबर ब्लॉक असल्यामुळे त्या दोघांचे बोलणे होऊ शकले नाही. यामुळे नाराज झालेल्या विरेंद्र यांनी पत्नी व आपल्या मित्रांना मेसेज व व्हिडिओ पाठवून आपण आत्महत्या करत असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांनी दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. डॉक्टरांनी मुलीच्या गळ्यातून S आकाराचा हूक काढला दुसरीकडे, सांगलीच्या मिरज येथील स्फुर्ती शुभम सोकटे नामक 6 वर्षीय मुलीने S आकाराचा एक लोखंडी हूक गिळल्याची घटना समोर आली आहे. हा हूक स्फुर्तीच्या अन्ननलिकेत अडकला होता. सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अत्यंत शिताफीने तो बाहेर काढला. विशेष म्हणजे गळ्यात हूक अडकल्यानंतर स्फुर्तीच्या पालकांनी प्रथम तिला एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी हा हूक बाहेर काढण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयांचा खर्च व जिवाचा धोकाही सांगितला होता. त्यानंतर कुटुंबाने मिरजच्या सरकारी रुग्णालयात धाव घेतली होती. तेथील सर्जन डॉक्टर प्रशांत दोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही सर्जरीशिवाय हा हूक एन्डास्कोपी प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित बाहेर काढला. मुलीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर