ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

भोंदू अशोक खरातची 13.92 कोटींची रोकड, फार्महाऊस, मर्सिडीज कार जप्त:26 मेपर्यंत ईडी कोठडीत, राहाता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही जोडले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत खरातकडून तब्बल १३.९२ कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि लक्झरी मर्सिडीज अमेरिकन डॉलर असा कोटयावधीचे घबाड जप्त केले आहे. तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा मुख्य गुन्हा सिद्ध होत असल्याने ईडीने यात उडी घेतली. १३ एप्रिल ते १८ मे २०२६ दरम्यान ईडीने आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या निवासस्थानांवर, व्यावसायिक ठिकाणांवर आणि बँक लॉकर्सवर मोठे छापे टाकले. ईडीच्या छापेमारीत घबाड हस्तगत करण्यात आले आहे. अमेरिकेत खरातने घेतले वैद्यकीय उपचार खरात स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगायचा. लोकांमध्ये काळी जादू आणि मृत्यूची भीती निर्माण करून, त्यांच्याकडून ‘अवतार पूजा’, धार्मिक उपचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळत होता. खरातने केवळ एका तक्रारदाराकडून तब्बल ५.६२ कोटी रुपये उकळले होते. या पैशातून त्याने लक्झरी मर्सिडीज कार खरेदी केली, परदेश वाऱ्या केल्या, अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेतले आणि आलिशान फार्महाऊस विकसित केल्याचे तपासात समोर आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर