ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

NCP च्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का?:सुनील तटकरे म्हणाले – आम्ही उत्सुक नाही, पण परिस्थिती उद्भवली तर निर्णय घेतला जाईल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाविषयी एक सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणी उत्सुक नाही, पण तशी एखादी परिस्थिती उद्भवली तर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीए सोबत असल्याची बाबही आवर्जून निदर्शनास आणून दिली. राज्यातील महापालिका निवडणुकीत शरद पवार व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची अत्यंत सुमार कामगिरी झाली. अनेक ठिकाणी या पक्षांना मानहाणीकारक पराभव पत्करावा लागला. यामुळे या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी गुरुवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले, मी याविषयी फार काही बोलू शकत नाही. कारण, विलीनीकरण हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आम्ही भाजपप्रणित एनडीएचा भाग आहोत हे या प्रकरणी प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) विलीनीकरणासाठी उत्सुक नाही. पण तशी एखादी परिस्थिती उद्भवली, तर योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण आम्ही महाराष्ट्रात महायुतीत व राष्ट्रीय पातळीवर एनडीएचे भाग आहोत व पुढेही राहू हे मी या प्रकरणी स्पष्ट करतो. यापुढेही युतीचे महापालिका सूत्र वापरले जाणार सुनील तटकरेंनी यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढण्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, जिथे शक्य असेल तिथे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतील. पण जिथे आघाडी शक्य नसेल, तिथे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढतील. महापालिका निवडणुकीत आम्ही जे सूत्र वापरले, तेच सूत्र इथून पुढेही वापरले जाईल. अजित पवारांनी यासंबंधीची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. पण आम्ही एकत्र निवडणूक लढवली, तर आम्हाला एकाच चिन्हावर लढावे लागेल. एकत्र लढल्यास तुतारी किंवा घड्याळ या दोन्हीपैकी एका चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते, असे तटकरे म्हणाले. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पराभव का झाला? राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटाने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत युती केली होती. पण त्यानंतरही त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या घटनाक्रमावर भाष्य करताना तटकरे म्हणाले, आम्ही अजूनही निकालाचे विश्लेषण करत आहोत. कुठे चूक झाले हे कळल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. प्रत्येक महापालिका निवडणुकीचे समीकरण वेगळे असते. आम्ही जनमताचा आदर करतो. सध्या आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करत आहोत. आता निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपाचा विषय संपला आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतच राहतात, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर