ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय:आयटीआयमध्ये ‘पीएम सेतू’ योजना राबवणार; शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याला मुदतवाढ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२७ जानेवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रोजगार, उद्योग, आणि महसूल विभागाशी संबंधित निर्णयांचा समावेश असून, तरुण विद्यार्थ्यांपासून ते कंत्राटदारांपर्यंत अनेक घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयटीआयमध्ये ‘पीएम सेतू’ योजना (रोजगार व कौशल्य विकास) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) आता ‘पीएम सेतू’ (Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. अंमलबजावणी: पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील संस्थांमध्ये ही योजना सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार केला जाईल.
२. कंत्राटदारांसाठी ‘ट्रेड्स प्लॅटफॉर्म’ (सार्वजनिक बांधकाम) सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके (Pending Dues) वेळेवर अदा करण्यासाठी ‘ट्रेड्स प्लॅटफॉर्म’ (TReDS Platform) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंत्राटदारांची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. ३. धुळ्याच्या सूतगिरणीचे पुनरुज्जीवन (वस्त्रोद्योग) धुळे येथील ‘जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी’चे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस करण्यात येणार असून, यामुळे स्थानिक शेतकरी आणि कामगारांना मोठा आधार मिळणार आहे. ४. शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याला मुदतवाढ (महसूल) विविध कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याचा (Lease) कालावधी वाढवून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि १९७१ च्या नियमांनुसार जे पट्टे ३० वर्षांसाठी दिले जातात, त्यांच्या कालावधीत वाढ करण्यात येणार आहे. ५. शत्रू संपत्तीवर मुद्रांक शुल्क माफी (महसूल) केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या ‘शत्रू संपत्ती’च्या (Enemy Property) खरेदी-विक्री व्यवहारांसाठी आता मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अशा संपत्तींच्या हस्तांतरणातील अडथळे दूर होणार आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर