ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतंय:अजितदादा खूप आठवण येत राहील, अभिनेता संकर्षण कराडे भावूक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामतीत विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने फक्त राजकीय विश्वच नाही, तर संपूर्ण देश आणि महाराष्ट्र हळहळले आहेत. त्यांच्या जाण्याने राजकारणात एक अपूरसठळा निर्माण झाला आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी राजकीय नेते होते, ज्यांची शैली नेहमीच माणसांमध्ये आदर आणि विश्वास निर्माण करणारी होती. अनेक जण त्यांना फक्त राजकीय नेते म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, आधार आणि मित्र म्हणूनही ओळखत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचा मार्गदर्शनाचा हात सदैव प्रेरणादायी ठरायचा.या दु:खद घटनेनंतर, मराठी अभिनेता संकर्षण कराडे यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दुःख व्यक्त केले. संकर्षण कराडेंवी पोस्ट काय? संकर्षण कराडे म्हणाला की, मा. अजित पवार सरांचं जाणं फार दूर्दैवी …काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली कि , आधार वाटतो… त्यातले अजीतदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे… खूप त्रास होतोय… !!!गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले हि भावना मी समजू शकतो …!!! अपघातात त्यांच्यासह प्राण गमवलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…!!! अजितदादा… खूप आठवण येत राहील …
अजोळ देवळाली-प्रवरा, राहुरीच्या विकासासाठी कायमच दिली साथ‎
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा‎उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा‎ जन्म 22 जुलै 1959 रोजी ‎देवळाली-प्रवरा येथे झाला. अजोळ‎ तसेच जन्मभूमी देवळाली प्रवरा‎ हिच असल्याने त्यांचे या गावाशी ‎कायमच अत्यंत जिव्हाळ्याचे नाते‎ होते. राजकीय जीवनात सर्वोच्च‎ पदांवर पोहोचूनही त्यांनी आपल्या ‎मामाच्या गावाशी असलेली नाळ ‎कधीच तुटू दिली नाही. त्यांच्या‎ अपघाती निधनाचे वृत्त धडकताच‎पूर्ण गाव शोकसागरात बुडाला अन्‎ कडकडीत बंद पाळून त्यांना‎ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.‎देवळाली प्रवरा ही केवळ त्यांची‎ न्मभूमीच नव्हती, तर त्यांच्या बालपणीच्या आठवणी, संस्कार ‎आणि माणुसकीची शिदोरी देणारी ‎भूमी होती. अजित पवार हे ‎कै.अण्णासाहेब लक्ष्मण कदम‎ पाटील यांचे भाचे होत. तसेच‎ देवळाली प्रवरा येथील माजी आमदार चंद्रशेखर लक्ष्मण कदम पाटील यांचे ते आतेभाऊ होते देवळाली प्रवरा येथेच अजित पवार यांचे बालपण गेले. येथील सामाजिक सांस्कृतिक वातावरणात ते वाढले लहानपणापासूनच त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न, ग्रामीण जीवनातील अडचण आणि कष्टकरी समाजाचे दुःख जवळून अनुभवले. याच अनुभवांची छाप त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत कायम दिसून आली. देवळाली प्रवरा आणि राहुरी तालुक्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी नेहमीच विशेष लक्ष दिले पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच विविध विकासकामांसाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली मामेभाऊ चंद्रशेखर‎ कदमांना अश्रू अनावर‎ “माझ्यापेक्षा वयाने लहान, पण‎ कर्माने मोठे असलेले अजित दादा‎चे जाणे हे मोठे दुर्दैव आहे, अशा
‎शब्दांत माजी आमदार चंद्रशेखर ‎कदम यांनी आपल्या भावना व्यक्त ‎केल्या. आपली आमदारकी
‎दादांमुळेच झाल्याचे त्यांनी बोलून ‎दाखवले. मी त्यांच्या पक्षात नसलो ‎आणि भाजपात असलो तरी त्यांनी‎ कधीही कोणत्याही कामाला नकार‎ दिला नाही,” असे सांगताना कदम यांना अश्रू अनावर झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर