ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ क्लबमध्ये अश्लील चाळे:पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादात, व्हिडिओ व्हायरल; नागरिकांतून संताप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लबमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुण – तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना दिसत असल्यामुळे पुण्यातील पब संस्कृती व नाईटलाईफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीचा बॅस्टियन क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी व मद्यधुंद वातावरण दिसून येत आहे. याचवेळी काही तरुण व तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सर्वांपुढे अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे कृत्य सुरू असताना क्लबमध्ये त्यांच्या आजुबाजूला क्लबमध्ये आलेल्या अनेकांची उपस्थिती होती. हे कृत्य पाहून अनेकांनी तेथून बाहेर पडणे पसंत केले. तर काहींनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. दुसरीकडे, हा व्हिडिओ केव्हाचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दिव्य मराठी त्याची पुष्टीही करत नाही. पण या व्हिडिओचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटलेत. सार्वजनिक ठिकाणी आणि एवढ्या गर्दीत चाललेल्या या ओंगळवाण्या प्रकारावर पुणेकर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. विशेषतः पालकांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. शहरातील तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन नेमक्या कोणत्या दिशेने चालली आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. क्लबमध्ये असे प्रकार राजरोसपणे सुरू असताना क्लब प्रशासनाचे याकडे लक्ष कसे गेले नाही, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हे ही वाचा… ऑटोचालकावर कोयत्याने भयंकर हल्ला:पुण्यातील राजमाता भुयारी मार्ग पुलावरील घटना; पुलावरून खाली पडला म्हणून वाचला, VIDEO पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर एका ऑटो चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हल्लेखोर रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करत असल्याचे दिसून येत आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात भीतीची लाट पसरली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर