ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

प्रशिक्षणातून फळबाग व बांबू लागवडीसाठी प्रबोधन

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कृषि विभागाचा उपक्रम

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील वेगाव (मठ) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. कृषि विभागामार्फत आयोजित या शेतकरी प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतीशील शेतकरी कैलास डोंगरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कृषि विभागाच्या विविध योजना, महाविस्तार AI app व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रगतीशील शेतकरी कैलास डोंगरकर यांनी फळबाग लागवड, बांबू लागवड व बांबू लागवडीचे अर्थशास्त्र तसेच त्यांचे शेतातील प्रयोग याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाययोजना याविषयी संवाद साधला.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर यांनी कडधान्य पिकांच्या अधिक उत्पादनाचे तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व संचालन सहायक कृषि अधिकारी निखिल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सनथ घोसळकर यांनी केले.

कार्यक्रमाकरिता वेगावच्या सरपंच श्रीमती देरकर मॅडम , उपसरपंच दीपक कळसकर , निलेश गौरकर, सुनील टोंगे, योगेश्वर कापसे, अजय बदकी,आकाश राजुरकर, राजेश सूर ,परम पांडे , गौरव कळसकर,प्रवीण वैद्य यांचेसह परिसरातील भरपूर शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर