ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक:सोहम योगाभ्यासी मंडळाचे आयोजन, अनेकांची उपस्थिती‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक योग दिनाचे (२१ जून) औचित्य साधून योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी दस्तुरनगर येथील सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागात योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक देणे सुरू करण्यात आले आहे. आरोग्य ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी स्थानिक छत्री तलाव परिसराच्या खुल्या मैदानात सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने गुरूवार ११ रोजी सकाळी योगाभ्यासाचे प्रात्याक्षिक करण्यात आले. तसेच १३ जून रोजी पहाटे ६ वाजतापासून शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवटेकडी येथे योगाचे प्रात्याक्षिक केले जाणार आहे. त्यानंतर १६ जून रोजी सकाळी ६ ते ७ या वेळात यशोदानगर परिसरातील भीमटेकडी येथे योग महोत्सव साजरा होणार आहे. २१ जून रोजी जागतिक योग दिन असून या दिवसापर्यंत ठिकठिकाणी योगाभ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपक्रमाचा समारोप जागतिक योगदिनी स्थानिक दस्तूरनगर येथील कमल प्लाझा मंगल कार्यालयालगत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात होणार आहे. आरोग्य ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी योगाभ्यासात सहभागी होण्याचे आवाहन सोहम योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, योग प्रशिक्षक दिलीप शेलोटकर यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर