ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार?:ऑपरेशन टायगर 3.0 सुरू, 14 पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील- गुलाबराव पाटलांचा दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा रंगली असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात आल्यानंतर आता १४ पेक्षा जास्त आमदारही आमच्यासोबत येतील, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाले आहे. थोडं थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वतः आदित्य ठाकरे यांनीही म्हटले आहे. जेव्हा शिंदे दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होते.” शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की ‘ऑपरेशन’ यशस्वी गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, “ऑपरेशन ३.० ला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. जेव्हा ते दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होते. हे खुद्द उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनीही कबूल केले आहे.” या शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर खोचक टोला फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खोचक टोला लगावला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे; मुलाने (आदित्य ठाकरेंनी) काम केले नाही, तर बापाने ते केलेच पाहिजे.” संजय दिना पाटलांना सल्ला पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिला आहे. “पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ करणे चुकीचे आहे. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी ‘सॉरी’ म्हणायला काहीच हरकत नाही,” असे खडेबोल त्यांनी सुनावले. हे ही वाचा.. बदनामीचे राजकारण थांबवा: पक्षांतराच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार आक्रमक, ‘शिंदे गटात जाणार’ चर्चांवर दिला पूर्णविराम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षांतराच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर